इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आपल्या प्लॅटफॉर्मला सुरक्षित करण्यासाठी नवनवीन फीचर आणत असते. आता कंपनी आपल्या मेसेजिंग अॅपला अधिक सुरक्षित करण्यासाठी फिंगरप्रिंट सिक्युरिटी फीचर देणार आहे. हे फीचर व्हॉट्सअॅप वेबमध्ये मिळणार आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स आपल्या चॅटला अधिक सुरक्षित करू शकतील. फिंगरप्रिंट सिक्युरिटीच्या फीचर्सचा सर्वात मोठा फायदा, दुसरी कोणतीही व्यक्ती युजरच्या परवानगीशिवाय नवीन वेब सीजन क्रिएट करू शकणार नाही.
भारतात मोठ्या संख्येने असे युजर्स आहेत जे कॉम्प्युटर्स किंवा लॅपटॉपवर व्हॉट्सअॅपचा वापर करतात. अनेकदा व्हॉट्सअॅप वेबला लॉग आउट करण्यास विसल्यानंतर दुसरी कोणतीही व्यक्ती चॅट वाचू शकते. हे फीचर आल्यानंतर डायरेक्ट क्यूआर कोड स्कॅन करून व्हॉट्सअॅप वेब उघडणार नाही. तर यासाठी युजर्सला आपल्या फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅन करावे लागेल.
सध्या या फीचरचे व्हॉट्सअॅप बिटा व्हर्जनवर ट्रायल सुरू आहे. लवकरच हे फीचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे.