महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सातारा :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन कराड येथील यशवंतराव चव्हाण रक्तपेढी येथे करण्यात आले होते यावेळी 48 जणांनी रक्तदान केले हा उपक्रम सातारा जिल्हा राष्ट्रवादी पदवीधर संघामार्फत राबवण्यात आला.
सध्या कोरोनाच्या प्रादुर्भाव लोकांना रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सुनील पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी पदवीधर संघ याच्या चर्चेतून सध्या भासत असलेली रक्ताचा तुटवडा भरून कढण्यासाठी राज्यात रक्तदांन शिबिरे आयोजित करण्यात आली होती त्या निमित्ताने कराड येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिराला खासदार श्रीनिवास पाटील, सहकार मंत्री मा बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य, प्रतापराव साळुंखे, शिवाजी पवार, विनायक पाटील, व सौरभ पाटील सर्व नगर सेवक कराड, सतीश पाटील, प्रशांत पाचपुते उपस्थित होते. तसेच यशवंतराव चव्हाण ब्लड बँकचे डॉ संदीप यादव व त्यांचा कर्मचारी वर्ग याचा कोविड योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे जिल्हाअध्यक्ष अभिजित सोमदे, सरचिटणीस हणमंतराव माने, अब्दुल रहेमान पटेल, तालुकाध्यक्ष विकास पाटील, सुदाम जाधव, महादेव तुपे, महादेव बनसोडे,ओमकार देशमुख व धनंजय कुंभार, विजय देसाई इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.