महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : फलटण
फलटण नगरपालिका वार्ड क्रमांक 10 मधील सार्वजनिक सांडपाणी वाहून जाणारे गटारा वरील बांधकाम तुटल्यामुळे व सांडपाण्याचे पाणी वाहून जाण्याचे पाईप फुटल्यामुळे सर्व दुर्गंधीयुक्त गटाराचे पाणी रस्त्यावर येत होते. व खानविलकर यांचा इमारती इमारतीमध्ये मुरत होते. गेली कित्येक दिवस या समस्येचा पाठपुरावा वार्ड मधील नगरसेवक यांच्याकडे करून सुद्धा कोणतेही सुधारणा झाली नाही. तसेच नगरसेवकांचे उत्तरही थातुरमातुर होते व जाणीवपूर्वक दुर्लक्षित करण्याजोगे होते काय? असा प्रश्न प्रभागातील रहिवाशांना पडला होता.

नगरसेवकांनी दिलेली उत्तरे पुढील प्रमाणे ‘सध्या शहरात कोठेही गटाराची कामे चालू नाहीत चालू झाल्यावर बघू’, ‘नगरपालिकेकडे पाईप शिल्लक नाहीत पाईप आल्यावर बघू’, ‘विषय सभेमध्ये घ्यावा लागेल टेंडर काढावे लागेल नंतर बघू’. अशी उत्तरे प्रभागातील नगरसेवक देत होते. व आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या विषयाकडे सहा ते सात महिने दुर्लक्ष करत हॊते. इतर प्रभागातील नगरसेवक स्पष्टपणे म्हणत होते की तुमच्या घरातील नगरसेवकांकडून लेखी पत्र आणा आम्ही लगेच काम करून देतो. यामुळे जनतेला काम करून घेण्यासंबंधीचा हा नवीनच नियम समजला. यानंतर प्रभागांमधील लोकांनी आरोग्य सेवेबद्दलचे गलिच्छ व किळसवाणे राजकारण असह्य झाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, व फलटण शहराध्यक्ष सचिन खानविलकर, यांची भेट घेऊन सदर प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली. त्यानुसार या दोघांनीही फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन सदर लोकांची व्यथा मांडली. व येत्या १ ऑक्टोबर पर्यंत संबंधित काम न झाल्यास २ऑक्टोबर पासून उपोषणास बसणार आहोत असे मुख्याअधिकारी यांना सांगितले त्यामुळे मुख्याधिकारी यांनी या प्रश्नात तात्काळ लक्ष घालून हा प्रश्न सोडवला. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रात मुख्याधिकारी यांचे जाहीर आभार मानले.
सदर सांडपाण्याच्या गटाराचा व बांधकामाचा प्रश्न हा स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी मार्गी लावला असून सदर कामाचं श्रेय कोणीही घेऊ नये”
धनंजय महामुलकर जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना


















