महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले(कळंब – इंदापूर)
राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील पत्रकार बांधवांना , संघटनेच्या माध्यमातून शासन दरबारी आवाज उठवून , न्याय देण्याची भूमिका अनेक वर्षापासून , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे साहेब यांनी घेतल्यामुळेच , नवोदित पत्रकारांना व पत्रकारितेला बळ मिळते आहे . त्यामुळे भोकरे यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गगार राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले .
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजयजी भोकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ( २६ ऑगस्ट रोजी ) इंदापूर येथे, सकाळी ११ वाजता उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . कोरोना चा प्रादुर्भाव अधिक असल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुहास शेळके यांचेकडे फळे सुपूर्द करण्यांंत आली .
यावेळी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते , मुख्य सचिव सागर शिंदे,ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर गलांडे , जिल्हा संपर्कप्रमुख महेश स्वामी , उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुहास शेळके , डॉ.अंकुश बळनागुरे , परिचारिका श्रीमती कोकरे , निंबाळकर , गणेश टुले , पत्रकार संघाची कार्यकारणी सदस्य सुरेशराव मिसाळ , सिनेअभिनेते शिवकुमार गुणवरे , शिवाजी आप्पा पवार , प्राध्यापक दत्तात्रय गवळी , लक्ष्मणराव सांगवे , विजयराव शिंदे , इम्तियाज मुलाणी , आबासाहेब उगलमुगले,विशाल तावरे , प्रेस फोटोग्राफर राजेंद्र भोसले , अक्षय आरडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते .
पुढे बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सामाजिक जाणिवेतून अनेक वर्षापासून काम करीत आहे . इंदापूर तालुक्यात कोरोना सारख्या दुर्धर आजाराचा प्रादुर्भाव असताना , तालुका पत्रकार संघाने तालुक्यातील तब्बल १३ हजार कुटुंबांना मोफत जीवनावश्यक वस्तू व धान्य पुरवून वेगळा आदर्श निर्माण केला आहे . त्यामुळे पत्रकार संघाचे कार्य उल्लेखनीय आहे . वाढदिवसानिमित्त इतरत्र खर्च न करता , रुग्णांना मोफत वाटप करून समाज उपयोगी वाढदिवस साजरा होत आहे.या गोष्टीचा मनोमन आनंद वाटतो . आगामी काळात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कोणत्याही उपक्रमाला , पाहिजे ते सहकार्य दिले जाईल अशीही ग्वाही माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली .
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते म्हणाले की , पत्रकार संघाचे राज्य संघटक भोकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना वेगळा आनंद मिळत आहे . पत्रकार संघाचे संस्कार हे समाजोपयोगी काम करण्यासाठी , पत्रकारांवर बिंबवले जात आहेत . त्यामुळेच गोरगरीब जनतेला इंदापूर तालुक्यात पत्रकार संघाच्या माध्यमातून मदत मिळत आहे . आगामी काळात देखील पत्रकार संघाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम दमदार राबवले जातील . मात्र पत्रकारांचे असणारे असंख्य प्रश्न शासनदरबारी पोचण्यासाठी भोकरे साहेब यांना विधान परिषद देण्यात यावी अशी अपेक्षा इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांनी व्यक्त केली .
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका मुख्य सचिव सागर शिंदे व पत्रकार संघाचे मुख्य मार्गदर्शक मधुकर गलांडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर आभार सिनेअभिनेते शिवकुमार गुणवरे यांनी मानले .