माण तालुक्यातील वडगाव येथे अकरा हेक्टर गायरान जमिनीवर वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
कोरोनाच्या संकटात आपल्याला ऑक्सिजनची किती गरज आहे हे समजले त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपण करून झाडांची काळजी घेणे ही काळाची गरज बनलेली आहे. तुमच्याकडे किती पैसा आहे यापेक्षा तुमच्याकडे किती ऑक्सिजन याचे महत्त्व आता संपूर्ण जगाला कळले आहे. भारत देशाच्या विकासामध्ये सैनिकांचे व शेतकऱ्यांचे योगदान हे उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन अभिनेता व सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे यांनी माण तालुक्यातील वडगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रमाच्या वेळी केले
यावेळी वनसंरक्षक सामाजिक वनीकरण रंगनाथ नाईकडे, अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग सातारा धर्मवीर सालविठ्ठल ,गटविकास आधिकारी पाटील, प्रशासक वडगाव चितळकर , ग्रामसेवक कळसकर ,तलाठी तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सयाजी शिंदे बोलताना म्हणाले या प्रकल्प मध्ये सातारा जिल्ह्यातील भारतीय सेनेनेमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या नावाने प्रत्येकी एक झाड लावले जाणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी शहिदांचे स्मारक देखील उभारले जाणार आहे.सगळ्यात जास्त शेतकरी आणि जवान हे देशाच्या विकासासाठी सातत्याने कष्ट करत असतात त्यामुळे त्यांची आठवण म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या नावाने सह्याद्री देवराई उभारत आहोत.ग्रामीण भागांमध्ये प्रशासकीय अधिकारी जर चांगले असतील तर महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र शासनाच्या सर्व योजना या सर्वसामान्य लोकांपर्यंत गावकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोचत असतात.खेड्यातील लोकांनी गट-तट विसरून एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी शासनावर अवलंबून न राहता लोकसहभागातून काम करणं गरजेचे आहे.वडगाव येथील सह्याद्री देवराई या झाडांच्या प्रकल्पासाठी अधिकाऱ्यांनी व गावकऱ्यांनी पुढाकार घेतलेला आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन वडगाव ग्रामपंचायत व मान्सून शेतकरी स्वयंसहाय्यता समूहाच्या व सह्याद्री देवराई या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने माध्यमातून करण्यात आले होते. यावेळी वडगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सोशल डिस्टंसिंग चे पालन करून वृक्षारोपण करण्यासाठी उपस्थित राहिले होते.
शहीद झालेल्या सैनिकांची आठवण म्हणून वृक्षारोपण
या प्रकल्प मध्ये भारतीय सेनेने मध्ये शहीद झालेल्या जवानांच्या नावाने प्रत्येकी एक झाड लावले जाणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी शहिदांचे स्मारक देखील उभारले जाणार आहे. हा प्रकल्प माण तालुक्यातील वडगाव येथील भारतीय नागरिकांना वेगळा आदर्श व प्रेरणादायी ठरेल.






















