महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ( इंदापूर): शहाजीराजे भोसले
महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांना महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांचे सन. २०२० / २०२१ चे पहिल्या हप्त्याचे अनुदान मिळण्याबाबत पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे वतीने निवेदन देण्यात आले .
निवेदनात राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांचे अनुदान लवकरात लवकर मिळावे , त्या अनुदानामध्ये ग्रंथालय कर्मचारी यांचे गेल्या ६ महिन्यांपासूनचे वेतन समाविष्ट आहे .
सार्वजनिक ग्रंथालयांना शासनाकडून पहिला हप्ता न मिळाल्याने अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे . कार्यरत कर्मचारी यांचेही वेतन न मिळाल्याने त्यांचीही परिस्थिती अत्यंत बिकट व हलाखीची झाली आहे , असे नमुद करण्यात आले आहे .
यावेळी ना.दत्तात्रय भरणे यांनी संबंधित विभागाच्या मंत्रीगणाशी चर्चा करून अनुदानाचा हप्ता १५ दिवसात देण्यात येईल , अशी ग्वाही दिली . यासमयी पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष काका चव्हाण, प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार , सदस्य अंबादास कवळे , राजेंद्र ढमाले , मोहन शिंदे , राजेंद्र वाकसे , चंद्रशेखर कपोते , विलास चोंधे , संतोष गोफणे उपस्थित होते


















