महाराष्ट्र न्युज प्रतिनीधी:(म्हसवड)
कृष्णा वेण्णा कोयना या नदीचे पुराचे वाया जाणारे पाणी दुष्काळी भागातील तालुक्यातील गावांना देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य माजी अभियंता संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील पोरे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
याबाबत त्यांनी यापूर्वीच गेल्यावर्षी नोव्हेंबर 19 मध्ये निवेदन दिलेले होत. निवेदनाप्रमाणे माण- खटाव या दुष्काळी तालुक्यांना कृष्णेचे पुराचे वाहून जाणारे पाणी देता येईल .हे पाणी शासनाच्या खर्चाने द्यावे. विजेचे बिल शासनाने भरावे.अशी मागणी करण्यात आलेली होती.यासाठी लागणारे विज बिल महाराष्ट्र शासनाने टंचाईच्या फंडातून भरावे अशी माजी अभियंता संघटनेची मागणी आहे. माण तालुक्यामध्ये दरवर्षी दुष्काळ पडतो या दुष्काळात पाणी पुरवठा करण्यासाठी लाखो रुपये टॅंकर साठी खर्च करावे लागतात.
हा टँकर साठी लागणारा खर्च व चारा छावणी सुरु करण्यासाठी होणारे शासनाचे लाखो रुपये खर्च या मुळे वाचणार आहेत. शासनाने तातडीने निर्णय घेऊन याबाबत कार्यवाही करावी ,अशी मागणी करण्यात आलेले आहे. यावर्षी पावसच्याअंदाजानुसार पावसाळ्यामध्ये 104 टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवलेला आहे. त्यानुसार यावर्षी कोल्हापूर ,सांगली, सातारा या परिसरामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते .आणि त्यामुळे या परिसरातील लोकांना धोका होतो. यापूर्वीच पुराचे जाणारे व पाणी माण खटाव या दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना द्यावे.तालुक्यातील शासनाचे लाखो रुपये वाचतील आणि पूरजन्य परिस्थिती वर मात करता येईल. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात कार्याध्यक्ष सुनील पोरे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलेले आहे.याबाबत तातडीने शासनाने निर्णय घेऊन संबंधित खात्याला आदेश द्यावेत अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे