महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / बिदाल
फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनच्या अंकित असलेले दुधेबावी घाटातील पोलीस मदत केंद्र नुसत नावाला असल्याचं दिसत.राज्य महामार्गावर असलेल्या या महत्वपूर्ण घाटात एवढ लूटमारीच प्रकार घडतात,त्यात अनेकांना आपला जीव ही गमवावा लागला आहे,कितीतरी अपघात घडत असतात,पणं त्यांना योग्य वेळी मदत उपलब्ध होत नाही.
पावसाळ्यात दरडी कोसळतात, अनेक अडचणी निर्माण होत असतात.त्याचबरोबर अनेकांच्या जिविताचा प्रश्न निर्माण होतो, म्हणून स्थापन केले गेलेल हे पोलीस मदत केंद्र उभारल गेलं आहे,पणं हा टोळक्यांचा अड्डा झाल्याचं चित्र पहायला मिळतय. त्यात ना कोणता पोलीस कर्मचारी उपलब्ध आहे ना कोणता मदतनीस.हे मदतकेंद्र जोडप्यांचा अड्डा बनल्याच चित्र त्या केंद्रातील परिस्थिती पाहिली असता लक्षात येते.
या घाटात फक्त पोलीस मदत केंद्र असल्याची पाटी लावली आहे,पणं खर तर चोर आणि रोमांस करणाऱ्या जोडप्यांचा हा एक अड्डा बनल्याच चित्र आहे. याकडे वेळीच लक्ष वेधण्याची गरज आहे.अन्यथा नागरिकांना या घाटातून रात्री अपरात्री प्रवास करताना जीव मुठीत घेऊन कसरत करावी लागणार आहे, याकडे फलटण पोलीस स्टेशनने सुध्दा लक्ष देणं गरजेचं आहे.