महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ( कळंब – इंदापूर): शहाजीराजे भोसले
१ आक्टोंबर हाथरस ( उत्तर प्रदेश ) येथील झालेल्या सामुहिक बलात्कारातील सर्व आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याबाबत इंदापूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी करण्यात आली असून , तसे निवेदन इंदापूर तहशील कार्यालय येथे नायब तहसीलदार शुभांगी अभंगराव यांना देण्यात आले .
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील एका गावातील १९ वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर तिच्यावर दिल्ली येथील समदरजंग रूग्णालयात उपचार सुरू होते, मात्र तिचा दुर्दैवी मृत्यू झाला .
पीडित मुलीची जीप कापल्याने ती बोलू शकली नाही . परंतु तिच्यावर अत्याचार करणारे नराधमांना तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी इंदापूर तालुका यांच्या वतीने करण्यात आली आहे .
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे हनुमंत कांबळे , दत्तात्रय घोडके , बापूसाहेब साबळे , संजय चंदनशिवे , सुनिल गायकवाड , पवन पवार , प्रमोद चव्हाण , राहुल सोनवणे , सागर लोंढे , विकी जगताप , विकास गायकवाड , प्रल्हाद बोबडे आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत .