दहिवडी : ता.१९
दहिवडी कॉलेजमध्ये ‘व्हय,मी सावित्रीबाई’ या नाटकाचा प्रयोग यशस्वी झाला. गेल्या ३० वर्षात सुमारे ०१हजारहून अधिक प्रयोग झालेले हे नाटक विद्यार्थिनींना अनुभवता आले.
इन्फोटेक कम्प्युटर एज्युकेशन दहिवडी, महिला सबलीकरण समिती व मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयोजित व प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे यांच्या सहकार्याने अंजोर निर्मित प्रस्तुत सुषमा देशपांडे लिखित व दिग्दर्शित ‘व्हय, मी सावित्रीबाई’ हे नाटक शुभांगी भुजबळ व शिल्पा साने यांनी सादर केले. बुधवारी सकाळी आणि दुपारी अशा एकूण दोन सत्रात हा नाटकाचा प्रयोग दहिवडी कॉलेजच्या कर्मवीर सभागृहात पार पडला. या नाटकाच्या माध्यमातून सादरकर्त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट उलगडत उपस्थितांसमोर मांडला. भाषाशैली आणि खड्या आवाजाने त्यांनी उपस्थितांना जागेवर खिळवून ठेवले होते.
या नाटकाला दहिवडी कॉलेजमधील आज कन्या विद्यालयासह रयत इंग्लिश मीडियम स्कुलच्या विद्यार्थिनींचा मोठा प्रतिसाद लाभला.
सुषमा देशपांडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून या नाटकाचा हेतू स्पष्ट केला.तसेच हे नाटक लिहितेवेळी आलेल्या अनुभवांचे कथनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी डॉ.सुरेश साळुंखे, उपप्राचार्य डॉ.अनिल दडस, डॉ.नंदिनी साळुंखे, डॉ.संजय खेत्रे, रयत इंग्लिश मिडियम स्कुलच्या मुख्याध्यापिका भारती जाधव, एमकेसीएलच्या दहिवडी शाखेचे केंद्र समन्वयक प्रदीप जाधव, बंटी पाटील, लिंगराज साखरे यांच्यासह विविध मान्यवर प्राध्यापक -प्राध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.उज्वला मदने यांनी केले. आभार डॉ.मीरा देठे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा.अर्चना पोरे यांनी केले.