महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (इंदापूर) : शहाजीराजे भोसले
कोरोनाच्या जागतिक महामारीचे संकट दूर व्हावे आणि कोरोना विषाणू नष्ट करणारी लस लवकरच विकसित व्हावी, अशी प्रार्थना धन्वंतरी यज्ञाव्दारे करण्यात आली. कै.लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे मंदिरात अधिक मासानिमित्त श्री विष्णू याग व धन्वंतरी याग आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. शिवराज प्र. कदम-जहागीरदार, विश्वस्त युवराज गाडवे, उत्सवप्रमुख शिरिष मोहिते, वंदना मोहिते आदी उपस्थित होते.
ट्रस्टचे यंदा १२३ वे वर्ष आहे. मंदिरात धन्वंतरी याग डाॅ. चंद्रभान पाटील व नयना पाटील यांच्या हस्ते पार पडला. तर विष्णू याग ट्रस्टचे विश्वस्त चंद्रशेखर हलवाई व नुतन हलवाई यांच्या हस्ते संपन्न झाला.






















