सोलापूर दि.८(जिमाका): सोलापूर शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकास कामे सुरू आहेत. काही कामे प्रलंबित आहेत. प्रलंबित कामांना गती देण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.
नियोजन भवन येथे स्मार्ट सिटी कामाच्या आढावा बैठकीत श्री. भरणे बोलत होते. यावेळी महापालिकेचे आयुक्त पि. शिवशंकर, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे पाटील, कार्यकारी अभियंता उमाकांत माशाळे, नगर अभियंता संदीप कारंजे आदी उपस्थित होते
स्मार्ट सिटी अंतर्गत ३२ कामांपैकी १६ कामे पूर्ण झाली आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्ण झालेल्या कामाबाबत आढावा घेऊन वापरात आणावी. उजनीच्या दुहेरी पाईपलाईनबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे निविदा प्रलंबित आहे. त्याबाबत त्वरित कारवाई करावी. तसेच सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकर मार्गी लावावा, अशा सूचना श्री. भरणे यांनी दिल्या.
पार्क चौकातील स्टेडियमचे काम पूर्ण झाले असल्याने याच्या वापराचे नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.