महाराष्ट्र न्यूज सातारा प्रतिनिधी :
सातारा जिल्हा हा क्रांती वीरांचा जिल्हा असून पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण गणपती लाड यांना लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रचंड मताने विजयी करा अरुण अण्णा यांना क्रांती वीरांचा वारसा असून राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे जय जय कार करणाऱ्या भाजपाला या निवडणुकीत धडा शिकवा असे आवाहन सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शफीक शेख यांनी केले आहे.
आपले बहुमोल विचारपूर्वक महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मत देऊन देशासाठी बलिदान केलेल्या क्रांती वीराच्या वारसाला मत देऊन विजय करून खरी श्रध्दाजली अर्पण करावी. असं मत व्यक्त केले आहे.