महाराष्ट्र न्यूज बिदाल प्रतिनिधी :
व्यवसाय करण्यासाठी महिला बचत गटांनी घेतलेल्या कर्जाची वसुली करण्याचा तगादा सध्या मायक्रो फायनान्स व बँका कडून होत आहे. पण गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाच्या महामारी व लॉकडाऊन मुळे ग्रामीण भागातील महिला व पुरुष यांना रोजगार मिळत नाही. कर्जमाफी मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने दहिवडी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यार आले.

यावेळी माण तालुक्यातील महिला व बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या बाजू मांडल्या . दरम्यान दि. 21 सप्टेंबर रोजी बहुजन समाज पार्टीच्या वतीने दहिवडी तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले होते. याच अनुषंगाने आज हे धरणे आंदोलन करण्यात आले .यावेळी दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये ही यासंदर्भात एक निवेदन देण्यात आले .सध्याची प्रतिकूल परिस्थिती संपून ग्रामीण भागातील आर्थिक जीवन सुरळीत चालू होईपर्यंत ही वसुली थांबवावी , अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी सौ. प्रीती सावंत, रुपाली भोसले , सुनीता सावंत , सखुबाई करडे, हवाई सावंत , रुपाली पारसे, सिंधुताई कांबळे , वैशाली देवकुळे , नंदाबाई भोसले , मीना सावंत , तेजु भोसले , बायडाबई बनसोडे , लता सावंत , ज्योती सावंत , उषा कांबळे या महिला उपस्थित होत्या.
यावेळी किरण सावंत वसंत बनसोडे ,प्रशांत शिंदे व सामाजिक कार्यकर्ते , जालिंदर सावंत , गणेश कांबळे , बापूराव शिंदे हे उपस्थित होते.






















