महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :बारामती
बारमती शहरामध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला असून एक महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला आहे. महिलेचे वय २९ वर्षीय असून बारामती शहरातील आमराई मध्ये वास्तव्यास आहे. सदर महिलेची खाजगी हॉस्पिटलमध्ये स्लॅब घेऊन चाचणी घेतली असता पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आमराई परिसरातील सुहास नगर घरकुल जय भीम स्तंभ हि सीमा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे तरी सर्व बारामती शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लॉकडाऊन शिथिलतेचा गैरफायदा घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये गरजेच्या कामासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्स ठेवणे व सॅनिटायझरचा वापर करणे अत्यंत गरजेचे असून प्रशासनाला सहकार्य करावे अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
































