महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी रेठरे खुर्द ता. कराड येथील डॉक्टर वैभव कळसे यांची निवड करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत त्याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दीदी दुहन, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, उपाध्यक्ष सुभाष कदम उपस्थित होते. या निवडीबद्दल डॉ. कळसे याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.