महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी:बिदाल
पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त माण तालुक्यातील दहिवडी येथे तहसीलदारांना बारा वाजता धनगर समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी निवेदन दिले. हे निवेदन धनगर ऐक्य अभियानाचे राज्य संयोजक डॉ शशिकांत तरंगे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे धनगर समाजावर आजही अन्याय होत असून दिवसेंदिवस मेंढपाळावर हल्ले वाढत आहेत, धनगर समाजाचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहे. धनगर समाजाची एसटी आरक्षनाची अमलबजावणी तात्काळ करा, धनगर समाजाला एसटी आरक्षण देऊनच मेगा भरती करावी, विद्यार्थ्यांच्या जात पडताळणी प्रकरणी त्वरित आदेश द्यावेत, दूध उत्पादनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मेंढीला राष्ट्रीय पशुचा दर्जा मिळावा, पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर व यशवंतराव होळकर यांचा इतिहास अभ्यासक्रमात समावेश करावा.धनगर समाजातील मेंढ्या चरण्यासाठी वने आरक्षित करून त्यांना पास उपलब्ध करून घ्यावा, या मागण्यांसाठीचे निवेदन आज देण्यात आले तर या आमच्या मागण्या सरकार पर्यंत पोहचवाव्या अशी मागणीही यावेळी केली. यावेळी धनगर ऐक्यचे समन्वयक सुनील वाघमोडे,अमृत चौगुले ,सचिन वाघमोडे ,महेश सुळे,रघुनाथ भिसे, हनुमंत काळे ,प्रतीक खताळ ,अमोल वाघमोडे, अभिजित वाघमोडे, सुशांत जानकर,एकनाथ वाघमोडे व माण तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते.