उपोषणाला इंदापूर तालुका वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा – दत्तात्रय घोडके
महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
इंदापूर तालुक्यातील आनंदघन ( जंक्शन ) ग्रामपंचायत हद्दीतील दलित वस्तीला ये – जा करणारा रस्ता अडवणूक प्रकरणी तहशील कार्यालयासमोर दलित बांधव लाक्षणिक उपोषणास सोमवार, दि.५/१०/२०२० रोजी कुटुंबियांसमवेत बसले आहेत.
गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी जाणिवपूर्वक दलित वस्तीवर जाणारा रस्त्याची अडवणूक केली आहे. याप्रकरणी तहशिलदार व गटविकास अधिकारी यांना पाठपुरावा करूनही रस्त्याचा प्रश्न न सुटल्याने लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.
दलित बांधवांनी कुटुंबियांसोबत सुरू केलेल्या लाक्षणिक उपोषणास इंदापूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा व्यक्त केलेचे अध्यक्ष दत्तात्रय घोडके , हनुमंत कांबळे , प्रमोद चव्हाण , सागर लोंढे , हनुमंत बनसोडे यांनी सांगितले .