दहिवडी : ता.०५
माण तालुक्यातील येळेवाडी गावात आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवून रोख दोन हजार आणि गाभण शेळी चोरून नेहली या बाबत दहिवडी पोलिसानी तात्काळ तपास करत त्या माळेगाव येथील दोन अट्टल चोरट्यांना अटक करून त्यांच्या कडून एक लाख चौतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला माहिती सपोनि अक्षय सोनवणे यांनी दिली.
दहिवडी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आज सकाळी नऊ वाजता येळेवाडी येथे सिंधू सर्जेराव विरकर वय 50 या आपल्या घरी असताना दोन अनोळखी इसम काळ्या रंगांच्या दुचाकीवरून तिथं आले वृद्ध असल्याचे पाहून सिंधू विरकर यांच्या गळ्याला चाकू लावून बळजबरीने त्यांच्या जवळ असणारे दोन हजार रुपये हिसकावून घेऊन जाताना त्यांच्या दारात असणारी गाभण शेळी उचलून त्यांच्या जवळील दुचाकीवरून ते घेऊन गेले यानंतर सदर घटना अन त्या अनोळखी लोकांचे वर्णन फोन द्वारे पोलिसांना सांगण्यात आले.
परिसरात एका पंचनामा कामानिमित्ताने गेलेल्या पोलीस जवानांना संपर्क साधत ते वर्णन त्यांना सांगत माहिती दिली. तपासाला सुरुवात केली सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे,सहाय्यक फौजदार प्रकाश हांगे,पोलीस नाईक रवींद्र बनसोडे, पोलीस नाईक रवींद्र खाडे, पोलीस कॉन्स्टेबल महेश सोनवलकर पोलीस नाईक प्रमोद कदम यांनी चोरट्यांचा तपास करत या पथकाने तासाभरात त्यांना अटक केली. त्यांच्याकडून गाभण शेळीसह रोख दोन हजार आणि दुचाकी असा ०१ लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. त्या अट्टल चोरट्यांना अटक केली. त्यानुसार स्थानिक नागरिकांनी यामध्ये खूप सहकार्य केले आहे.