इंदापूर तहसीलवर भाजपचा मोर्चा
महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
राज्यातील महाविकास आघाडीचेबिघाडी सरकार हे महिलांवरील अत्याचार रोखणे , कोविड रुग्णाना सुविधा , कर्जमाफी योजना , शेती पिकांना नुकसान भरपाई देणे , मराठा आरक्षण आदी सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले आहे . राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करून भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तीन पक्षांच्या या महाआघाडी सरकारचा पंचनामा करण्याची वेळ आली आहे , असा घणाघात सोमवारी (दि.१२) इंदापूर येथे केला.
इंदापूर तहसील कार्यालयावर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा महाविकास आघाडी सरकार व तालुका लोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेचा निषेध करणेसाठी आज मोर्चा काढण्यात आला . सदर प्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी आघाडी सरकार व इंदापूरच्या लोकप्रतिनिधीवर अनेक उदाहरने देत जोरदार टीकास्त्र सोडले . राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे , असे असताना येथील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आम्हांस न्याय द्या , म्हणून प्रशासनाकडे मोर्चा काढावा लागतो , हे सरकारच्या निष्क्रियतेचे मोठे उदाहरण आहे . अधिकाऱ्यांच्या बदल्या १५ जून नंतर करू नयेत , असा नियम असताना राज्य सरकार हे सध्या बदल्या करून भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला .
इंदापूर तालुक्यात प्रशासनाचा दोष नाही , दोष हा येथील नेतृत्वाचा आहे . येथील प्रशासनाने निःपक्षपणे वागावे , जनतेला न्याय द्यावा , अन्यथा विरोधी पक्ष म्हणून आम्हांस आक्रमक भूमिका घ्यावी लागेल , असा इशारा हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात दिला.तालुक्यात बांधकाम खात्याचा राज्यमंत्री असूनही रस्त्यांची वाट लागली आहे . कोरोनाची गंभीर परिस्थिती असतानाही वन खात्याकडून जनतेचे जनजीवन उध्दवस्त करण्याचे काम चालु आहे . इंदापूरात कोरोना रुग्णांना शासन बेडशीट देऊ शकत नाही . ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व इतर सुविधा देण्यास लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत . नितीन गडकरी यांनी पालखी मार्गासाठी निधी दिला आहे , मात्र गोखळी ते लुमेवाडी दरम्यान जाणूनबुजून भरपाई संदर्भात नोटीस देण्यात विलंब लावला जात असल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला
यावेळी इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष शरद जामदार , मारुती वणवे , तानाजी थोरात , माऊली चवरे , शीतल साबळे , उज्वला घोळवे यांची भाषणे झाली . इंदापूर पंचायत समिती येथून तहसीलदार कार्यालयावर मोर्चा आला . तेथे हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी निवेदन स्वीकारले . याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष शकिल सय्यद , मंगेश पाटील, मयूरसिंह पाटील , प्रदीप पाटील , दिपक जाधव , महेंद्र रेडके, दत्तात्रय शिर्के , रघुनाथ राऊत , शेखर पाटील , कैलास कदम , धनंजय पाटील , किरण पाटील , राम आसबे , सचिन आरडे , नानासाहेब गोसावी , शिवाजी तरंगे , आबा शिंगाडे , सुभाष काळे , राजकुमार जठार , पिंटू काळे , सचिन सावंत , अमोल इंगळे , दादा पिसे , अँड.आसिफ बागवान , चाँद पठाण , घन:शाम पाटील , गणेश घाडगे व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते .
विभागीय आयुक्तांना भाजप नेते भेटणार
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकांचे त्वरित पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, यासह इतर मागण्यांसाठी विभागीय आयुक्त सौरभ राव , जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख , जिल्हा पोलीस प्रमुख डॉ.अभिनव देशमुख यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील , खा.गिरीष बापट व मी आज (सोमवारी ) पुण्यात भेट घेणार आहे , अशी माहिती यावेळी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली .