सातारा : सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र ही सरपंचांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी सरपंच परिषद असून मागील दोन महिन्यांपासून सरपंच परिषदेने विविध प्रकारची आंदोलने केली. जसे की, जावली मध्ये कंदील मोर्चा सातारा मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर कंदील मोर्चा तसेच विविध मागण्यासाठी चे निवेदन तसेच पूर्ण महाराष्ट्र मध्ये कलेक्टर ऑफिस वर मोर्चे काढून जी खेडी स्ट्रीट लाईट बंद केल्यामुळे अंधारात गेली होती. त्याबाबत उठाव केला व शासनाकडे विविध चुकीचे आदेश रद्द करण्याबाबतची मागणी उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र सरपंच परिषद समाधान पोफळे मार्फत केली होती.
याबाबत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, पालक मंत्री तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे पदाधिकारी यांची ग्रामपंचायतीच्या असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी ची मीटिंग मंत्रालयामध्ये घेण्यात आली होती. आणि या मिटिंग मध्ये सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रच्या ४ मुख्य मागण्या होत्या.
मागण्या पुढील प्रमाणे : स्ट्रीट लाईटची विज बिले माफ करून बंद केले. स्ट्रीट लाईट चे कनेक्शन जोडण्याबाबत मागणी होती. यावर सकारात्मक निर्णय घेऊन उपमुख्यमंत्र्यांनी त्वरित तोडलेली वीज कनेक्शन जोडण्याचे आदेश दिले होते. त्या वेळात जे मार्चपर्यंत असणारे थकीत लाईट बिल भरल्या बाबतचा विचार शासनाने केला, व त्यानुसार मार्च नंतर चालू असणारे बिल ग्रामपंचायतीला भरण्याच्या सूचना केल्या, हा खूप मोठा सकारात्मक निर्णय झाला.
आपले सरकार सेवा केंद्राचे कंम्प्युटर ऑपरेटर नेमण्याचे सर्व अधिकार हे जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीला देण्यात यावेत. कारण, आत्ता असणारी संस्था ग्रामपंचायत कडून पैसे घेऊन कोणत्याही प्रकारची सुविधा ग्रामपंचायतीला पुरवत नाही. याबाबतचा निर्णय अजून शासन दरबारी झालेला नाही आणि त्याबात आजही आपण शसनाबरोबर भांडत आहोत.
महाराष्ट्र शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला कर सल्ल्यासाठी जयस्तुते मॅनेजमेंट कंपनीची निवड केली होती. या निवडीत एक जुलैपासून प्रति महिना सहा हजार रुपये ग्रामपंचायतीला कर सल्ल्यासाठी द्यावे लागणार होते, त्यामुळे ग्रामपंचायतीचे मोठे नुकसान होणार होते म्हणून शासनाने याबाबतचा फेरविचार करून हा निर्णय मागे घ्यावा. याबाबत चर्चा झाली होती यानुसार हा निर्णय मागे घेऊन या कंपनीकडून कर सल्ला घेणे बंधनकारक नसल्याबाबतचे पत्र आदेश आज देण्यात आला.
सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र ची मांत्रालय मध्ये झालेल्या मिटिंग मध्ये 1 मागणी वगळता जवळपास मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत आणि हे सरपंच परिषदेचे यश आले आहे. शासनाने घेतलेल्या या सर्व निर्णयांचे सरपंच परिषद स्वागत करून महाराष्ट्र शासनाने आभार व्यक्त करत आहे.
