दि: 03 ऑगस्ट 2023 फिनिक्स कृषी सैनिक शेतकरी उत्पादक सह. संस्था आणि राष्ट्रीय संशोधन केंद्र कोल्हापूर विभागामार्फत शेतकऱ्यांना प्रती एकरसाठी 8 किलो मका बीज व बीज प्रक्रिया कीट वाटपाचा कार्यक्रम आणि बीज प्रक्रिया याबाबत शेती कार्यशाळा घेण्यात आली यामध्ये तडवळे गावातील प्रगत शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. रणजितसिंह देशमुख ( भैयासाहेब) यांनी सांगितले कि, फिनिक्स कृषी सैनिक शेतकरी उत्पादक सह. संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती बाबत प्रशिक्षण वर्ग, माती परीक्षण, बीज प्रक्रिया, मशागत प्रक्रिया यावर विशेष लक्ष देण्यात येईल. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजार पेठ व काढणी पश्चात केल्या जाणाऱ्या प्रक्रिये बाबत मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ मार्गदर्शक उपलब्ध केले जातील.
सदरच्या शेती शाळेस राष्ट्रीय संशोधन केंद्र कोल्हापूर येथील डॉ.सुनील कराड, (मका पैदासकार)डॉ. प्रविण गजभिये, (मृदा शास्त्रज्ञ), डॉ. महेंद्र यादव, (पशू वैद्यक), डॉ. सुहास भिंगारदेवे, (मका कृषी विद्यावेत्ता), श्री. धनाजी शिरगावे व श्री. सागर शेळके, कृषी सहाय्यक आणि कृषी विज्ञान केंद्र सातारा येथील श्री.महेश बाबर सर उपस्थित होते.
श्री.डॉ. सुनील कराड सर यांनी मका पिक लागवड,पिकाचे अर्थशाशस्त्र, बियाणे निवड, बियाणे खरेदी व बीज प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी या बाबत माहिती दिली. डॉ. प्रवीण गजभिये यांनी माती परीक्षणाचे महत्व नमूद केले, डॉ. महेंद्र यादव यांनी पशु संवर्धन काळाची गरज या विषयी पशुपालकांना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित मान्यवरांनी नवीन तंत्रज्ञान अवगत करून नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवनवीन योजना व शासनाच्या उपक्रमा बाबत माहिती सांगितली. कार्यक्रमास कंपनीचे सर्व संचालक,कृषी विभाग,वडूज चे सर्व कर्मचारी व तडवळे गावातील मका उत्पादक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन करून कंपनी राबवत असल्याच्या योजनांची माहिती कंपनीचे संचालक श्री.अजितकुमार घाडगे यांनी सांगितली. मका लागवडीनंतर पिकाची काळजी घेण्यासाठी पुढील मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले जाणार असून पीक जोमदार वाढी साठी आवश्यक असणारी खते व औषधांचा पुरवठा कंपनीमार्फत केला जाणार असलेचे सांगून या आनंदराव जगदाळे यांनी कार्यक्रमास उपस्थित असणारांचे आभार मानले.