नवारस्ता प्रतिनिधी : संपूर्ण चाफळ विभागाचे लक्ष लागून राहिलेल्या दाढोली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री दाढोबा ग्रामविकास पॅनेलने शिवसेना पुरस्कृत दाढोबा शेतकरी ग्रामविकास पॅनेलचा धुव्वा उडवत सर्वच्या सर्व जागांवर आपल्या पॅनलचे वर्चस्व राखले आहे. दाढोली विकास सोसायटी वर राष्ट्रवादीचा झेंडा फडकल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत विजयोत्सव साजरा केला.
पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सातारा जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर व राजेश पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल प्रमुख प्रकाश पवार, तुकाराम डांगे यांनी ही निवडणूक यशस्वी करून विरोधकांचा धुव्वा उडविला. 13 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजयी संपादन केल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. या निवडणुकीत तुकाराम डांगे, गणेश डांगे, खशाबा पवार, जयवंत धावडेकर, परशराम महाबळ, तानाजी महाबळ, संजय पवार, अक्काताई पाटील, मंगल डांगे, दिलीप सुतार हे उमेदवार विजयी झाले. जालिंदर गायकवाड व विठ्ठल झोरे हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.
विजयी उमेदवारांचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, संचालक सत्यजितसिंह पाटणकर, राजेश पवार, पंचायत समिती सदस्या रुपाली पवार, संभाजीराव देशमुख, पॅनल प्रमुख प्रकाश पवार, तुकाराम डांगे, परशराम महाबळ, विनोद डांगे, नथुराम सुतार, अजय डांगे, आबासाहेब धावडेकर, नारायण पवार, भगवान गायकवाड, यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.