महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी/सातारा :
सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांची सोलापूर ग्रामीण येथे बदली झाली असून अजय कुमार बंसल हे सातारचे नवे पोलीस अधीक्षक असणार आहेत.
तेजस्वी सातपुते या गेल्या दीड वर्षांपासून सातारा जिल्ह्याच्या पोलीस प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी या कार्यकाळामध्ये पोलीस दलासाठी विविध उपक्रम राबविले. दरम्यान त्यांच्या या बदलीने सातारा जिल्हा पोलिस दलातील एका ‘तेजस्वी’ पर्वाचा अस्त झाला असला तरी अजय बंसल यांच्या रूपाने गुन्हेगारी क्षेत्रावर पुढेही पोलिसांचा ‘जय’ व्हावा, अशी अपेक्षा जिल्हावासीयांकडून असणार आहे.