महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी :
घटस्थापनेपासून सर्वत्र शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे साखरवाडी मध्ये नवरात्र उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत असतो नवसाला पावणारी देवी म्हणून साखरवाडी मधील दुर्गा माता मंदिर ओळखले जाते संध्याकाळी आरतीच्या वेळी परिसरातील महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.
या शारदा उत्सव काळात दरवर्षी मोठे कार्यक्रम आयोजीत केले जातात परंतु यंदा संपूर्ण जगामध्ये व देशांमध्ये कोरोना चे संकट वाढले आहे याचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्या असून हा नवरात्र उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा होत आहे यामुळे भाविकांनी गर्दी करू नये असे आवाहन नवरात्र शारदा उत्सव मंडळ साखरवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे