गेल्या काही दिवसांपासून एस टी कामगारांचा संप सुरू होता. परंतु आता संप मिटल्यानंतरही वाई तालक्यातील बऱ्याचश्या ग्रामीण भागात एस टी सेवा पूर्ववत सुरू झाली नसल्याने विद्यार्थ्यां सहित ग्रामीण भागातील जनतेस प्रवासासाठी प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने तसेच विद्यार्थी वर्गास महाविद्यालय तसेच शाळेत जाण्यास मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने ग्रामीण भागातील एस टी सेवा वाई आगाराच्या वेळापत्रकाप्रमाणे लवकरात लवकर पूर्ववत करावी जेणे करुन विद्यार्थी व ग्रामीण भागातील जनतेस त्याचा लाभ घेता येईल अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेस वाई तालुक्याच्या वतीने वाई एस टी महामंडळाच्या आगारप्रमुख यांना देण्यात आले. तसेच दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा ही या निवेदना द्वारे एस टी महामंडळास देण्यात आला या वेळी निवेदन देण्या करीता वाई तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समाधान आबा कदम, उपाध्यक्ष गौरव महंगडे, जिल्हा सरचिटणीस संतोष पवार.

अनिकेत शिंदे सुशील पिसाळ, विशाल पिसाळ, अभिजित जायकर, सुमित ननावरे, अनिकेत शिंदे, संकेत भोसले, संकेत दुधाने, चंदन नळ, संकेत पिसाळ, गौरव तरटे, गणेश ननावरे, सागर भोईटे, स्वप्निल तरटे यांसह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी युवक चे कार्यकर्ते उपस्थित होते.






















