महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कराड :
कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी व नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प.पु.अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज,(कनेरी मठ) यांनी तयार केलेल्या “रोगप्रतिकारक इम्यूनीटी बूस्टर या औषधांचे वाटप युवा विकास प्रतिष्ठान, कराड चे संस्थापक अध्यक्ष विष्णू काका पाटसकर यांच्यामार्फत आज “श्रीराम मंदिर परिसर उत्तरा लक्ष्मी मंदिर परिसर,भैरोबा गल्ली सोमवार पेठेत करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हे औषध संजीवनी आहे तरी सर्व नागरिकांनी हे रोगप्रतिकारक औषध घेऊन स्वतःची व आपल्या परिवाराची काळझी घ्यावी, असे आव्हान भाजपा युवा मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर यांनी सर्वांना केले आहे.
यावेळी अमृत गिजरे,योगेश कुलकर्णी रोहित घारे, सागर साळुंखे,सागर शिंदे,प्रवीण शिंदे,,निखिल सुर्वे,राजेंद्र चव्हाण,हरीश पाटील,शेखर शेवाळे, सुरज जिरगे,राजकुमार पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.