दहिवडी : ता.०५
माण-खटावच्या महसूल प्रशासनाकडून अवैधरित्या माती उत्खनन करून वहन करणाऱ्यांवर सोमवारी मध्यरात्री कारवाई करण्यात आली.
अधिक माहितीनुसार अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुक विरोधी पथकाने दहिवडी व म्हसवड परिसरात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुक विरोधी मोठी कारवाई केली. सदर कारवाईमध्ये दहिवडी येथे दहिवडी मायणी रस्त्यावर रात्री ११.३० च्या सुमारास वाहन क्रमांक एम एच-११सी एच ९२५६ व एम एच-११ एएल ४२९८ ही मातीने भरलेली मायणीकडे निघालेली वाहने सिध्दनाथ मंगल कार्यालयासमोर मायणी रोड येथे पकडण्यात आली. सदर वाहने पोलिस स्टेशन दहिवडी येथे जमा करण्यात आली आहेत.
त्याचबरोबर त्याच रात्री ०१.००च्या सुमारास ढाकणी पाझर तलावात विना परवाना माती उत्खनन करत असलेले जे.सी.बी.क्रमांक ०१) एमएच-११ डी ए-२५७२(मालक-सागर महादेव मदने) ०२) एम एच-११ यु ८९३७ (मालक-पोपट नरबट) ०३)एम एच-११सीजी ६४८०(मालक-मारुती गोरड) असे एकुण ०३ जे.सी.बी. व अवैध माती वाहतुक करत असलेले वाहन क्रमांक ०१)एम एच-११एएल ६१७०(मालक-अमोल विष्णू रासकर) 2) एम एच -११ बी एल ४७९७ (मालक-सागर महादेव मदने) ०३)एम एच-११ ए एल ८२७७(मालक- रामचंद्र विठल दिडवाघ) ०४) एम एच-११ ए एल ५९६४ (मालक- निलेश सावंत ) ०५) एम एच-११ ए एल ४९४२(मालक-जालिंदर काळे) अशी एकुण ०३) जे.सी.बी. व पाच डंपर घटनास्थळी पकडण्यात आले. सदर सर्व वाहने पोलिस स्टेशन म्हसवड येथे जमा करण्यात आली आहेत.
या कारवाईत उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार विकास अहिर, नायब तहसिलदार श्रीशैल व्हटटे व मयुर भुजबळ, म्हसवड पोलीस स्टेशनचे सपोनि शिवाजी विभुते, मंडल अधिकारी, सुनिल खेडेकर, तलाठी आसिफ शेख, बी. जे. वाघमारे, बी.एस. वाळके, वाय. बी. अभंग, पी.जी. जामनेकर, उत्तम अखडमल, मोहन खाडे, व इतर पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला.