अनेक कुटुंबे रस्त्यावर शासनाकडून मदतीची अपेक्षा
महाराष्ट्र न्यूज कळंब – इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
बुधवार, दि. १४ रोजी पहाटे ५ वाजल्यापासून दिवसभर पडत राहिलेल्या पाऊसाने व नीरा नदीतील पाणी पातळी वाढल्याने इंदापूर तालुक्यातील कळंब येथील लक्ष्मीनगर मधील घरात घुसल्याने सर्वांच्या घरात व दारात पाणीच पाणी झालेने लोकांना रात्र जागून काढावी लागली . पाणी पातळीत सतत वाढ होत असल्यामुळे घरातील सर्व वस्तू जागेवर सोडून द्याव्या लागल्याने अतोनात नुकसान झाले.
लक्ष्मीनगर मधील रहिवासी संदीपान चितारे, राहुल चितारे, दत्तात्रय शेंडगे, नाना बनसोडे, तुकाराम बर्गे, पुष्पा ढवाण – देवकर, जावेद शेख , महादेव तोरणे आदी लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे.काही कुटुंबियांच्या घराच्या भिंतीही कोसळल्या आहेत. यावेळी कळंबमधील पुढारी यांनी या कुटुंबियांना भेटून त्यांना धीर देण्याचे काम केले. व शासन स्तरावरून मदत मिळवून देण्याची हमी दिली.
नुकसानभरपाई मिळण्यासाठी कळंब येथील तलाठी सुरेश यादव , अनिल घोडके, ग्रामसेवक साळुंखे यांनी पिडीत २०० कुटुंबाच्या घरांचे पंचनामे केले आहेत.