महाराष्ट्र न्यूज फलटण : फलटण शहरातील शारदानगर कोळकी या ठिकाणी सौ. शकुंतला सिताराम माळी व श्रीमती. कस्तुरबा सिताराम माळी यांच्या बंद घराच्या खिडकीचे गज वाकून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सुमारे ६१ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला असून या सोन्याची किंमत १४लाख ३६ हजार १८९ रुपये असून सदर गुन्ह्याची फिर्याद श्रीमती. कस्तुरबा सिताराम माळी यांनी फलटण शहर पोलीस स्थानकात दिली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध भा द वि स ४५४,४५७,३८० नुसार गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुळ करीत आहेत.