महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
शिवसेना पक्ष प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना नेते युवा सेना प्रमुख राज्याचे पर्यावरण/पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्याचे नगरविकास/ सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे व खा. श्रीकांत शिंदे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे (मुळ संकल्पना- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष ,मंत्रालय, मुंबई) यांच्या सुचनेनुसार वंदनीय बाळासाहेब ठाकरे” “शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या” महेश पाटील ( कराड उत्तर विधानसभा सहायक) या पदासाठी निवड़ करण्यात आली.
याचे नियुक्तीचे पत्र राजाभाऊ भिलारे (शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे शहर प्रमुख तसेच पश्र्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख) , निमिश शहा (शिवसेना सातारा शहरप्रमुख तसेच वंदनिय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष सातारा जिल्हा समन्वयक यांच्या हास्ते पुणे येथील विभागीय कार्यालयात स्वीकारताना महेश पाटील ( कराड उत्तर विधानसभा सहायक) सोबत अजीत पुरोहित, दत्तात्रय गणपत रसाळ, संभाजी शामराव जगताप, मंगेश गंगाराम जाधव, शशिकांत चव्हाण, आनंदा कराडकर, मोहित शहा युवासेना इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोर गरीब गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रूग्णांना धर्मादाय रूग्णालयात (१०%+१०%)राखीव खाटा उपलब्ध करून देणे. निकषात बसत असलेल्या गरीब रूग्णांवर पुर्णत: मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्रक्रिया करण्यासंदर्भात महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत नोंदणी असलेल्या रूग्णांलयामध्ये गरजू रूग्णांना शस्रक्रिया मोफत करणे संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर रहाणे.
गंभीर महागड्या शस्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोर गरीब गरजू रूग्णांना भरीव प्रमाणात अर्थ सहाय्य व्हावे याकरिता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी,मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी श्री सिद्धिविनायक ट्रस्ट,टाटा ट्रस्ट,यासारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी थेट शिवसेना भवन येथील मुख्य कार्यालयास संपर्क साधने तसेच रूग्णांना रक्ताची उपलब्धता, अल्पदरात एॅब्युलन्स उपलब्ध करून देणे, आरोग्य शिबिर आयोजित करणे या पद्धतीने काम करण्यात येणार आहे.




















