महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी: समाजात माणुसकी अजूनही जिवंत आहे याचा प्रत्यय कालच्या घटनेनंतर आला.सुपने ता कराड येथील युवकांच्या सतर्कतेमुळे आज घरातून चुकलेली 9 वर्षाची मुलगी तिच्या आई वडिलांच्या कडे सुखरूप पणे पोहोच झाली.गारवडे ता पाटण येथील इ 3 रीच्या वर्गात शिकणारी मुलगी घरातून किरकोळ कारणातून सकाळी 10-11 च्या सुमारास रस्ता सापडेल त्या दिशेने निघाली.
दुपारी 2 च्या सुमारास ती सुपने गावच्या जवळ आली असता गावातील अमोल पाटील व हभप सुहास पाटील यांना निदर्शनास आली,त्यांना जरा संशयास्पद वाटल्याने त्यांनी तीला थांबवले व तिची विचारपूस केली तसेच त्यांनी हिंदू एकतेचे तालुकाध्यक्ष तुषार उर्फ गणेश पाटील तसेच मा अजित जाधव यांना याबाबतची कल्पना दिली. त्यानंतर त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन माहीत विचारली असता तिने तिचे गाव नवसरवाडी ता पाटण सांगितले त्यानंतर त्यांनी लगेच मल्हारपेठ पोलीस ठाणे येथे संपर्क साधून संबंधित मुलीला घेऊन पोलीस स्टेशन गाठले.

पोलीस तपासात मुलीचे मूळ गाव गारवडे व तिचे जवळचे नातेवाईक नवसरवाडी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गारवडे गावी हिंदू एकतेचे कार्याध्यक्ष राहुल यादव यांना संपर्क करून तिच्या वडिलांकडे मुलगी सहीसलामत सुपूर्द करण्यात आली.युवकांच्या प्रसंगावधानमुळे पुढचा होणारा अनर्थ टळला.
या कामात मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील,कराड तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड,हिंदू एकतेचे अध्यक्ष गणेश पाटील,पोलीस कॉन्स्टेबल आकाश चव्हाण,अमोल देशमुख अजित जाधव,अमोल पाटील,हभप सुहास महाराज,हिंदू एकतेचे राहुल यादव,कुणाल चव्हाण,संतोष पाटील,पंडित तात्या यादव,तसेच गारवडेचे पोलीस पाटील यांचे सहकार्य लाभले






















