मुंबई-डाँ नितीन करीर भा.प्र.से. यांची महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल, काष्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघाचे शिष्टमंडळ अरुण गाडे अध्यक्ष, काष्ट्राइब यांचे नेतृत्वात भेटून त्यांचे अभिनंदन केले. व मागासवर्गीयांचे प्रलंबित सेवा विषयक प्रश्न, पदोन्नतीतील आरक्षण,राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांचे समायोजन, किमान वेतन, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर्स याना शासकीय दर्जा देणे व किमान वेतन 26हजार, समाज कल्याण विभागातला भोंगळ कारभार याबाबत चर्चा केली व निवेदन दिले.
एक आठवड्याचा कालावधी द्यावा नंतर सविस्तर बैठक आयोजित करण्यात येईल व मागासवर्गीयांचे प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले.
मा डाँ नितीन करीर, मुख्य सचिव महाराष्ट्र यांच्या हस्ते काष्ट्राईब दिनदर्शिकाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी अनिल धांडे, यशवंत माटे, डाँ सूर्यवंशी, दिलीप केदारे व प्रतिनिधी उपस्थित होते