महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
कराड नगरपालिकेकडून विजय दिवसाचे औचित्य साधत नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले. आज कराडमध्ये विजय दिवस समारोह संपन्न झाला. मात्र हा समारोह साध्या पद्धतीने नगरपालिकेकडून करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कराड नगरपरिषद कराड व एन्व्हायरो फ्रेंड्स नेचर क्लब कराड यांच्या वतीने कराड नगरी मधील नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले विजय दिवस चौकातूनच मास्क वाटपास सुरुवात करण्यात आली. चौकातील सिग्नल वर खासदार श्रीनिवास पाटील, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व मुख्य अधिकारी रमाकांत डाके तसेच नगरसेवक यांच्यावतीने मास्क वाटप करण्यात आले.
माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत करोना पासून रक्षण करूया, मास्क वापरा, हात धुवा, सुरक्षित अंतर ठेवा अशा आशयाचे फलक हातात घेऊन पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून जनजागृती करण्यात आली.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, मुख्य अधिकारी रमाकांत डाके, नगरसेवक विजय वाटेगावकर, गटनेते सौरभ पाटील, तसेच पालिकेचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.