डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे न्यू इंग्लिश स्कूल सातारा या शाळेमध्ये नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम घेतले जातात. शाळेमध्ये सकाळी गुरूंच्या प्रतिमेचे पूजन करून इ .पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेविषयी चे महत्व सांगण्यात आले . त्याचप्रमाणे शिक्षक पालक संघातर्फे शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला .तसेच सर्व वर्गातून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली . तसेच गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शाळेतील बाल शिल्पकार चि . मंदार महेश लोहार याने .त्याच्या कल्पनेतून शाळेतील कलाशिक्षक श्री संदीप माळी व घनश्याम नवले यांच्या नियोजनातून गुरूंचे शिल्प साकारण्याचे ठरले . त्यानुसार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . मनीषा मिनोचा मॅडम यांचे शिल्प शाडूच्या मातीमध्ये साकारण्यात आले .मिनोच्या मॅडम यांचे मंदारने हुबेहूब साकारलेले व्यक्तिशिल्प विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेत होते ..प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम भव्य कलादालनामध्ये शाळेतील पाचवी ते दहावीचे विद्यार्थी .शिक्षक पाल संघाचे सर्व प्रतिनिधी शाळेतील शिक्षक व शालेय पदाधिकारी त्यांचे समवेत अतिशय उत्साहात आणि आनंदात प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाची माहिती शाळेतील ज्येष्ठ कला शिक्षक घनश्याम नवले व संदीप माळी सर यांनी विद्यार्थ्यांना दिली तसेच बाल शिल्पकार मंदार लोहार याचे कौतुक अभिनंदन करण्यात आले .नंदाने साकारलेल्या व्यक्ती शिल्पाचे विशेष कौतुक शिक्षक पालक संघातील सर्व सदस्यांनी व शाळेतील मुख्याध्यापक शालेय पदाधिकारी शिक्षकांनी विशेष कौतुक केले .अशाप्रकारे एक गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून एका आगळावेगळा कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांपुढे एक शिल्पकलेबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात आवड निर्माण करून देण्यात आले.
आणि विद्यार्थ्यांनी आपल्या मध्ये कोणतीही एखादी कला आत्मसात करावी व जोपासावी याचे आवाहन शालामाऊलीतर्फ करण्यात आले .अशाप्रकारे या प्रात्यक्षिक नाविन्यपूर्ण उपक्रमाचे व बाल शिल्पकार मंदार लोहार व कला शिक्षकांचे कौतुक अभिनंदन शालेय समिती अध्यक्ष – अमित कुलकर्णी शालेय समिती सदस्य – अनंत जोशी सर शाला प्रमुख मनीषा मिनोचा उपशालाप्रमुख- सुजाता पाटील पर्यवेक्षिका – विनया कुलकर्णी व राजेश सातपुते सर आदींनी केले.