महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या रविवार दि.३१ जानेवारी रोजी बारामती शहर व तालुक्यातील विविध भूमिपूजन, उद्घघाटन तसेच काही ठिकाणी विकास कामांची पाहणी असा भरगच्च कार्यक्रम उद्या बारामती शहर व बारामती तालुक्यात होणार आहे यासाठी अजित पवार उपस्थित होणार आहे..
सुनिल निंबाळकर, बारामती प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या काही महिन्यापासून दर शनिवारी-रविवारी बारामतीत असायचे मात्र कोरोना काळात त्यांचे जाहीर कार्यक्रम झाले नव्हते गेल्या काही दिवसापासून अजित पवार बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या आवारात नेते मंडळी,कार्यकर्ते,ग्रामस्थ, यांची त्यांना भेटण्यासाठी एक ते दीड किलोमीटरची रांगा लागतात या सर्व नागरिकांना भेटून अजित पवार बारामतीचे विकासकामे पाहतात हा आजवरचा अनुभव आहे.
मात्र आता अजित पवार यांना उद्घाटनासाठी कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आहे तसा त्यांचा मागील आठवड्यात पहिला दिवस होता त्या दिवशी २ उद्घाटने अजित पवार यांनी केली मात्र येत्या रविवारी अजित पवार यांचे भरगच्च कार्यक्रम बारामती शहर व तालुक्यात होणार आहे उद्या रविवार दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी ७.
३० वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत अजित पवार बिझी आहेत त्या दरम्यान बारामती माळेगाव ,पणदरे,जळोची, देऊळगाव रसाळ आदी ठिकाणी अजित पवार यांचे नियोजित जवळपास १३ कार्यक्रम आहेत यामध्ये काही भूमिपूजन काही उद्घाटन तर काही ठिकाणी विकास कामांची पाहणी अशा प्रकारचे कार्यक्रमाचे नियोजन आहे. त्यातून सकाळी त्यांनी कार्यकर्त्यांसाठी राखीव वेळ ठेवला आहे.