सुनिल निंबाळकर, बारामती प्रतिनिधी…
बारामती येथे शेगर धनगर समाज वतीने राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन रयत भवन येथे करण्यात आले होते. या मेळाव्यात 297 वधू-वरांनी आपला परिचय दिला .कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन बजरंग खटके यांनी केले प्रास्ताविकात भारत बापू गावडे यांनी शेगर धनगर समाज सेवा महासंघाचे वीस वर्षाचे सामाजिक कार्य व यापुढे केले जाणारे कार्य याचा आढावा घेतला .यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष सुनील भगत ,भारत नाना गावडे ,दशरथ राऊत ,मारुती सांगळे, अश्विनीताई खर्चे,ऍड.वसुमती गावडे, भजनदास पवार उद्धवराव गावडे,पुरुषोत्तम खोमणे, धनंजय खोमणे, वैजनाथ गावडे, करण आटोळे,महादेव गावडे,मच्छिंद्र आटोळे ,गोरख चौलंग, युवराज मोकाशी,रामदास येडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते .याच कार्यक्रमात प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या अधिकारी व एस एस सी, एच एस सी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
वधू-वर पालक परिचय मेळावा ही काळाची गरज झाली आहे.समाजाच्या हिताच्या दृष्टीने मुलींचे विवाह जुळावे, पालकांचा वेळ व पैसा वाचावा,अनिष्ट रूढी टाळाव्यात, घटस्फोटीत विधवा मुलींना स्वीकारावे असे भावनिक आवाहन करून पांडुरंग मेरगळ यांनी समाजाच्या पिढीजात चालीरीती सांगितल्या. शेगर धनगर समाज बिरोबा, धुळोबा व भिवाई यांची पूजा करतो. समाजात पिढ्यान पिढ्या पासून पुनर्विवाह होतात .समाजाच्या विवाह, सामाजिक,शैक्षणिक,व्यवसायिक व प्रशासकीय सेवा यातील स्थानाला बाधा येईल असे वर्तन कोणी करू नये. समाज एकोप्याने राहावा असे कळकळीचे आवाहन केले.
अध्यक्ष सुनील भगत यांनी नोकरदार व्यावसायिक याचबरोबर शेतकरी मुलांनाही मुली द्या. शेतीव्यवसाय श्रेष्ठच असून समाजाचा खरा चेहरा शेतकरीच टिकवू�






















