महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी/ बारामती : बारामती एम. आय. डी. सी. परिसरातील शासकीय महिला रुग्णालयात पल्स पोलिओ लसीकरण शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित संपन्न झाला यावेळी अजित पवार यांनी रुग्णालयातील डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत ५ वर्षांपर्यंतच्या प्रत्येक बालकाला लस पाजण्यात यावी, एकही बालक लसीकरणापासून वंचित राहता कामा नये. आपल्या घरच्या, शेजारच्या, परिसरातल्या पाच वर्षांपर्यंतच्या प्रत्येक बालकाला लस पाजली जाईल; याची खात्री करावी, असं नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहिमेत सुमारे ११ लाख ३२ हजार ३५१ बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार आज रविवारी जिल्ह्यात ६ हजार ७०० बुथवर लसीकरण करण्यात येत आहे. ६ हजार २५४ पथकांच्या मदतीनं गृहभेटी देऊन लसीकरणाची मोहिम राबवण्यात येत आहे,असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक नांदापूरकर आरोग्य अधिकारी भगवान पवार वैद्यकीय अधिष्ठाता चंद्रकांत म्हस्के वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सदानंद काळे बारामती तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे तसेच महिला शासकीय रुग्णालय बारामतीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बापू भोई इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.