महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :रहिमतपुर
नागझरी ता. कोरेगाव जि.सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते व तंटामुक्तीचे अध्यक्ष मानसिंगराव भोसले (दादा) यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी सातारा जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील ,लोकनियुक्त सरपंच जितेंद्र भोसले, श्री जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन शंकरराव भोसले- पाटील, नागझरी गावचे माजी सरपंच आर.आर. फडतरे ,बाळासाहेब भोसले ,पांडुरंग भोसले (आबा), माजी सरपंच संदीप दीक्षित, देवानंद पोतदार ,आजी माजी सैनिक संघटनेचे ज्ञानदेव भोसले, तानाजीराव भोसले (आप्पा) यांनी मनोगत व्यक्त करीत आपापल्या आठवणी सांगीतल्या. यावेळी नागझरी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ मानसिंगराव भोसले (दादा) यांनी नागझरी गावच्या विविध कार्यक्रमांमध्ये तसेच श्री सिद्धनाथ यात्रा आणि इतर समारंभामध्ये स्वतः वेळ देऊन आपली गावाबद्दलची निष्ठा आणि कर्तव्य त्याने पार पाडले.
आदरणीय दादांनी आपल्या आयुष्यातील अनेक वर्ष नागझरी गावच्या सार्वजनिक दैवतांची यात्रा असेल नवरात्र उत्सव असेल गणपती उत्सव असेल लग्न समारंभ असेल अनेकांचा दुःखद प्रसंग असेल अशा एक ना अनेक शेकडो कार्यक्रमांच्या मध्ये आपण हिरीरीने सहभाग घेऊन ते कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आपले प्रामाणिक योगदान दिले आहे.
हे करताना प्रत्येकाची मर्जी राखणे शक्य नाही प्रत्येकाला हवं तसं होऊन देणे शक्य नाही अनेकांचा रोष घ्यावा लागतो आणि अनेकांच्या द्वेषाला सामोरं जावं लागतं परंतु दादा आपण गावाच्या हितासाठी रोश सुद्धा पत्करला.
नागझरी गावातील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय मानसिंगराव भोसले
( दादा) यांच्या ७५ व्या जन्मदिवसानिमित्त शुभेच्छा देताना मान्यवरांनी आपल्या भाषणात दादांच्या विषयी आठवणी सांगितल्या या कार्यक्रमास नागझरी, आर्वी, वाठार किरोली गावातील ग्रामस्थ सह मानसिंगराव भोसले (दादा) यांचे आप्तेष्ट कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विकास भोसले यांनी केले तर आभार कांतीलाल भोसले यांनी मानले.