नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर रोज राजकीय घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांसहित आसाम मधील गुवाहाटी येथे येका हॉटेल मध्ये आहेत. मात्र आज पहिल्यांदाच ते रॅडिसन हॉटेलच्या बाहेर आलेले दिसले. यावेळी मुंबईत लवकरच येणार असल्याचे त्यांनी संगितले आहे याशिवाय 50 आमदार हे स्वात:च्या मर्जीने माझ्यासोबत असल्याचे देखील त्यांनी म्हंटले आहे. शिवसेनेने आमदारांना जबरदस्तीने नेले असे म्हंटले होते. याला यावेळी उत्तर देत 50 आमदार स्वत:च्या मर्जीने आले. कोणत्याही आमदारावर जबरदस्ती केली नसल्याचे शिंदे यांनी म्हंटले आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट देखील केले आहे. या ट्विटमध्ये उदय सामंत हे बोलताना दिसत आहेत. बंडखोर गटात सामील झालेले उदय सामंत यांनी आपले मनोगत मांडले आहे. ” गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान सहयोगी पक्षाकडून सुरू आहे त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलो आहे. राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षाने एका सच्चा शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला, मात्र त्या निवडणुकीत देखील हा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मित्रपक्षांनी प्रयत्न केले.
गैरसमज करून घेऊ नये त्यामुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. असं असलं तरीही आजही ते शिवसेनेतच असून त्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांनी कोकणातील जनतेने कोणताही गैरसमज करून घेऊ नये.’ असे आवाहन बंडखोर गटात सामील झालेले उदय सामंत यांनी गुवाहाटी येथून व्यक्त केले आहे .