सातारा : सातारा तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे ग्रामीण व शहरी विभागाचे 137 तसेच श्रावणबाळ योजनेचे ग्रामीण व शहरी विभागाचे 61 अर्ज असे एकूण 198 अर्ज मंजूर करण्यात आले,अशी माहिती तहसीलदार यांनी दिली.
सातारा तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक तहसिलदार सातारा यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थितीत पार पडली. समितीपुढे मंजुर झालेल्या लाभार्थ्यांची यादी कार्यालयातील नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अनुदान मंजुर झालेल्या लाभार्थ्यांनी खाते उघडण्याबाबतचे पत्र घेऊन जावे. या पत्रासह नजिकच्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते उघडून खाते क्रमांक तहसील कार्यालयात द्यावा, असे आवाहनही तहसीलदार सातारा यांनी केले आहे.