महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :बारामती
बारामती शहर आणि तालुक्यातील १४ दिवसांच्या जनता कर्फ्यू नंतर आता सर्व व्यवहार सोमवारपासून सुरु होणार आहेत.सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत बाजारपेठ सुरु ठेवण्याचा निर्णय आज प्रशासन आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे १४ दिवसांपासून बंद असलेले सर्व व्यवहार सुरळीत होणार आहे.
व्यापाऱ्यांसाठी काही नियम बनविण्यात आले आहेत त्यामध्ये दुकानदार व त्यांचे कर्मचारी तसेच दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मास्कचा वापर अनिवार्य असेल. दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे हात सॅनिटायझरने स्वच्छ केले जातील प्रत्येक ग्राहकाचे थर्मल स्कॅनिंग व ऑक्सिजन लेव्हलचीही तपासणी अनिवार्य करण्यात अली आहे.प्रत्येक ग्राहकाचे नाव. पत्ता व मोबाईल क्रमांक नोंदविणे अनिवार्य करण्यात आले आहे.
किराणा मालाच्या दुकानातून पानपट्टीवरील काही वस्तूंची विक्री सुरु असल्याची तक्रार या बैठकीत झाली आहे. मात्र अशी विक्री करताना कोणीही दुकानदार आढळल्यास त्यावर कडक कारवाईचा इशारा दादासाहेब कांबळे यांनी दिला. याशिवाय बाजारपेठेमध्ये संशयित रुग्णांची तपासणी करण्याबाबतही सूचना करण्यात अली आहे.
बारामती शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी, मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष महावीर वडुजकार,माजी नगराध्यक्ष जवाहर वाघोलीकर, सुशील सोमाणी, प्रवीण अहुजा, स्वप्नील मुथा, विजय आगम यांनी यावेळी सूचना मांडल्या. रमणिक मोता, भारत खटावकर, शामराव तिवटणे, शैलेश साळुंखे, किरण गांधी, सागर चिंचकर, महेश साळुंखे, दीपक मचाले, गणेश फाळके, आदी या बठकीस उपस्थित होते.