महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :सातारा
वाई तालुक्यातील वाई सातारा रस्त्यावरील कुंभारवाडी गावच्या हद्दीत विनापरवाना माल ट्रक मधून चिंचच्या लाकूड मालाची वाहतूक चोरट्या मार्गाने होत असल्याची माहिती भुईंज कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मिळाल्याने त्यांनी या माळ ट्रक वर दि 28 जुलै रोजी छाप टाकून लकडासह माल ट्रकसह जप्त केला आहे
सनि अभिमन्यू कांबळे याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती वाई वनविभागाचे प्रमुख महेश झांजुर्णे यांनी दिली
सविस्तर वृत्त असे की भुईंज वनविभागाचे असलेले कर्मचारी वनपाल संग्राम मोरे वनरक्षक रजिया शेख संजय आडे लक्षुमन देशमुख लालसिंग पवार यांना दि 28 जुलै रोजी वाई सातारा रस्त्यावरील कुंभारवाडी गावच्या हद्दीतून टेम्पो क्रमांक MH 04 CP 4468 या मधून अवैद्य विनापरवाना रुक्ष तोड करून लाकडांची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळल्यावरून वरील सर्व वांकर्मचाऱ्यांनी छाप टाकून टेम्पो सह लाकडे आणि सनी अभिमन्यू कांबळे
पिराचीवडी ता वाई याच्यावर वनविभागाच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे या कारवाई मध्ये या कर्मचाऱ्यांनी साडे तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.