नुने या गांवी आरोपी बबन मल्हारी गायकवाड यांची शेत मिळकत गट क्र २११ असून त्याचे बाजूला तत्कालीन पो.उप-अधिक्षक श्री रमेश विष्णू बनकर यांची शेत मिळकत गट क्र.२१२ ही शेत मिळकत आहे. सन २००८ साली श्री रमेश बनकर यांनी गट क्र.२१२ मधील पुर्व बाजू कडील ३० गुंठे क्षेत्र रू ६ लाख या रक्कमेस खरेदी देणे चा तोंडी व्यवहार आरोपीं बरोबर करून ३० गुंठे क्षेत्र आरोपी अर्जून बबन गायकवाड यांस त्ते क्षेत्र ताब्यात दिले व रू ४ लाख रोख रक्कम रमेश बनकर यांना दिली,सदर ची रक्कम बबन गायकवड यांनी त्यांची वाशिेम येथील अडीच एकर जमीन विकून उभे केले आहेत
सदर जागेमध्ये सन २००८ साला पासून आरोपी हे शेती करत आहेत. सन २०१७ साली त्या क्षेत्रात हॅाटेल काढण्यासाठी अर्जुन बबन गायकवाड यांनी श्री रमेश बनकर यांना ३० गुंठे क्षेत्राचे खरेदी खत करणेबाबत विनंती केली असता मी पोलीस खात्यात नोकरी करत आहे मला वेळ मिळणार नाही सन २०१९ साली रिटायर्ड होणार आहे तेव्हा खरेदीखत करू असे सांगून त्या जागेत हॅाटेल सुरू कर मी काही अडचण करणार नाही असे वचन दिले त्या प्रमाणे अर्जून गायकवाड यांनी त्या ठिकाण रुद्राक्ष हॅाटेल व लॅाजिंग सुरू केले व ते चालू लागले.
सदर कामातील साक्षीदार श्री रमेश बनकर हे सन २०१९ साली निवृत्त झाले नंतर त्यांनी अर्जुन गायकवाड यांस त्या जागेचे खरेदीखत करणेस आज करू उद्या करू असे बोलून जागा तर तुझ्या ताब्यात आहै मी शब्द मोडत नसतो असे सांगून दोन वर्षे टाळाटाळ केली त्यानंतर सन २०२१ -२०२२ मध्ये ती जागा आरोपींनी सोडावी यासाठी रमेश बनकर यांनी आरोपाचे विरूध्द ६ ते ७ एन सी दाखल केल्या व दि.१/१/२०२२ रोजी निलगिरीची झाडे तोडून चोरी केली अशी तक्रार सातारा तालुका पो. ठाणे येथे दिली,त्याप्रमाणे घटना स्थळी बनकर साहेब २/३ पोलीसांना घेऊन त्वरीत गेले,पोलीसांना तेथे आरोपी अर्जून गायकवाड हा त्याचे गट क्र.२११ मध्ये त्यांचे क्षेत्रात असलेली निलगीरीची तोडलेली झाडे ट्रॅक्टरचे ट्रॅाली मध्ये ५/६ लोकांकडून भरत असताना पोलिसांनी त्यास विचारले की हे क्षेत्र कोणाचे आहे त्यावर आरोपीने त्यांना सांगितले की,गट क्र.२११ हा त्याचे वडिलांचा आहे व बनकर साहेबांनी आम्हाला गट क्र.२१२ मधील ३० गुंठे आमच्या ताब्यात २००७ सालापासून ताब्यात दिला असून तो खरेदीचा व्यवहार ६ लाखाचा आहे व ४ लाख दिले आहेत,पण बनकर साहेब खरेदीखत करणेस नकार देत आहेत त्यावर पोलीस अधिकारी म्हणाले आम्हाला चोरीच्या केसचा तपास करू देणेस हरकत करत आहात तुम्हाला ३५३ मध्ये अटक करत आहे असे बोलून त्या ठिकाणी बबन गायकवाड यांना बोलावून घेतले व दोघांना ताब्यात घेतले व अटक केली.
सत्र खटला १५६/२०२१ चे कामी प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार,निवृत्त पोलीस उप-अधिक्षक, श्री रमेश बनकर, फिर्याद पो उप-निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर दळवी, सुरेश भुजबळ, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी यांच्या साक्षी सरकार पक्षाचा पुरावा काय आहे हे सांगणारा असून, त्यांची उलटतपासणीतील उत्तरे सरकार पक्षाची केस ही कशी खोटी हे समोर आणतो. आरोपींनी जागेचा ताबा सोडावा म्हणून केलेल्या एन सी तसेच चोरीच्या केसचा गुन्हा हा घडलेलाच नाही हे उत्तर पोलीस अधिकारी यांचे कडूनच ॲड विकास बा.पाटील- शिरगांवकर यांनी उलट तपासातून समोर आणले.
सदरकामी ॲड. विकास पाटील- शिरगांवकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मे. जिल्हा न्यायाधीश -१ यांनी दोन्ही आरोपींना निर्दोष मुक्त केले. निरपराध लोकांना खोट्या गुन्ह्यांत अडकविले जाते यासाठी ॲड विकास बा.पाटील हे संबधित पोलीस अधिकारी व निवृत्त पोलीस उप-अधिक्षक श्री रमेश बनकर यांचे विरूध्द मानवी हक्क आयोगा कडे अन्यायग्रस्त पक्षकारचे वतीने दाद मागणार आहेत.
सदरकामी दि. १२/७/२०२४ रोजी झालेला निकाल, पोलीस निरपराध लोकांना कायद्याला हाताशी धरून कसे छळतात याचे उदाहरण आहे आणि लोकांना त्यांचे कडेच तक्रार नोंदवावी लागते.
बनावट,खोट्या केस मधून आरोपी सुटला की, त्याला वाटते की जाचातून सुटलो पण त्या जाच करणाऱ्या तपासा विरूध्द मात्र तो न्यायालात दाद मागण्यास कचरतो. जर केस खरी नसेल तर त्याच निकालामध्से संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणेबाबतचे निरीक्षण नोंदवणे काळाची गरज बनली आहे.न्यायालयीन व्यवस्थेवर लोकांचा दृढ विश्वास आहेच,पण तपास यंत्रणेवरील लोकांचा असेलेला विश्वास हा अधिक दृढ होण्यासाठी निकालपत्र मध्ये तसे निरीक्षण दिल्यास पोलीसांपुढे खोट्या तक्रारी दाखल करणेस आळा बसेल, असे परखड मत ॲड विकास बा. पाटील शिरगांवकर यांनी व्यक्त केले