कोळकी : निवड होऊन मुलाखती होऊन पात्र उमेदवारांना संस्थांकडून आणि शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून नियुक्तीपत्रे मिळाले नाहीत त्यामुळे उमेदवार संभ्रमात पडले आहेत.
राज्यात शिक्षक पद भरती मधील २०६२ जागांसाठी पवित्र पोर्टल मार्फत संस्थाचालकांच्या संकेत स्थळावर उमेदवारांची निवड केली गेली. जवळपास दोन महिने ही प्रक्रिया चालली. ओके आणि त्यानंतर मुलाखती पार पडल्या. नियुक्ती पत्रे मिळालेली नाहीत.
संबंधित उमेदवार संस्थेच्या आणि शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. राज्यात सरकारी आणि अनुदानित संस्थांमध्ये पवित्र पोर्टल मार्फत १२४६५ जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात आली या प्रक्रियेमध्ये संस्थांच्या सहावी ते बारावीच्या अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये असणाऱ्या २०६२ जागांसाठी ऑक्टोबर महिन्यात मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर संस्थाचालकांनी निवडलेल्या उमेदवारांची माहिती शिक्षणाधिकारी कार्यालय यांना देण्यात आल्या. शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी आवश्यक आहे. काही जिल्ह्यात शिक्षणाधिकारी यांनी आर्थिक देवाण-घेवाण यासाठी नियुक्तीपत्रे दिली नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
एन आय. सी च्या संगणकीय प्रणालीत बदल करण्यात येत असल्याचे कारण आयुक्त कार्यालयाकडून देण्यात येत आहे. अशा परिस्थितीत ऑफलाईन प्रक्रिया करून नियुक्तीपत्रे दिली तर उमेदवारांना वैयक्तिक मान्यतेसाठी आणि शालार्थ आयडी साठी शिक्षणाधिकारी कार्यालयात चकरा माराव्या लागतील. त्यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळेल आणि उमेदवारांना त्रास होईल. असे न करता संगणकीय प्रणालीतील संस्था लोगिन ला नियुक्ती त्या पवित्र पोर्टल वर उपलब्ध करून द्यावा व नियुक्तीचेआदेश देण्यात यावेत असे एमपीएससी समन्वय समिती समन्वयक सुरेश सावळे यांनी स्पष्ट केले आहे.