
मृत्युंजय दूत अभियानाला एक वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून भुईंज येथील साईविश्व मंगल कार्यालयात भुईंज महामार्ग पोलीस केंद्राच्यावतीने आयोजीत केलेल्या मृत्युंजय दूत कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सपोनि गुरव बोलत होते.
याप्रसंगी शैलेश मिश्रा,सिद्धेश काजरे,अनिकेत पाटील यांनी अपघातग्रस्त जखमी यांना गोल्डन आवर मध्ये करावयाची प्रथम उपचार तसेच जखमी यांना उचलून ॲम्ब्युलन्स मध्ये ठेवण्याची पद्धत याबाबत हजर असलेल्या मृत्युजंय दूत यांना सविस्तर असे बहुमोल मार्गदर्शन केले व त्याची प्रात्यक्षिके दाखवली.
तसेच उपस्थित मृत्युंजय दूतांपैकी वेळोवेळी अपघातामध्ये मदत करणाऱ्या मृत्युंजय दूत यांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.मृत्युजंय दूत यांना ओळखपत्र वाटप करण्यात आले.सदर कार्यशाळेस भुईंज महामार्ग पोलीस केंद्राचे अधिकारी व कर्मचारी हजर होते.





















