तत्कालीन पदावर असताना पुनर्वसन जमीन वाटपातील अनेक फाईल गहाळ
सातारा : आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावरील भूसंपादन प्रक्रियेत शेतकर्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईत कमिशनगिरी करण्यामुळे चर्चेत आलेल्या भूसंपादन अधिकारी सतीश धुमाळचे आता साताऱ्यातील पराक्रम बाहेर येऊ लागले आहेत.
सातारा जिल्हा पुनर्वसन कार्यालयात कार्यरत असताना सतीश धुमाळने वाटप केलेल्या जमिनींच्या फाईलच सापडत नाहीत. माहीती अधिकारात याचा उलगडा झालेनंतर धुमाळने खंडपीठात जाऊन माफी मागितल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखिल सेटलमेंट करत धुमाळला मोठ्या मनाने माफ केल्याच्या चर्चा आहेत. मात्र धुमाळ विरुद्ध तक्रार करणार्या तक्रारदाराला वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली क्लीनचीट मान्य नसल्याने धुमाळचे आणखी कारनामे बाहेर निघणार आहेत. त्यामुळे सतीश धुमाळने किती भ्रष्टाचार केला असेल याचा अंदाज लावू शकता.






















