महाराष्ट्र न्यूज मसूर प्रतिनिधी :
शिरवडे कोणेगाव रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन सुरु आहे.भवानीच्या ओढ्यावर तातपुरता भरावा टाकून रस्ता तयार करण्यात आला आहे.गेल्या पाच सहा दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे या रस्त्याचा भरावा वाहून गेला असल्याने कोणेगाव शिरवडे रस्त्यावरील वाहतूक बंद आसुन ही वाहतूक सुरळीत करावी आशी मागणी दोन्ही गावचे ग्रामस्थ करत आहेत.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजतून या रस्त्याचे काम झाले आहे.या रस्त्यावर भवानीच्या ओढ्यावर पुल आहे.त्या ठिकाणी पुलाचे काम झाले नसल्यांने वाहतूकीसिठी तातपुरता भरावा घालून रस्ता करण्यात आला आहे.सतत पडणार्या पावसामुळे हा रस्ता खचून गेल्यांने या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे.समंधीत बांधकाम विभागाने लक्ष घालून पुलाचे काम करावे अशी मागणी केली जात आहे.
































