महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचा सन २०२०-२१ च्या २० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंञी हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते रविवारी ( दि.११ ) उत्साही वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे उपस्थित होते.
नीरा भीमा कडून इथेनॉलचे १ कोटी २५ लाख लि. उत्पादनाचे उद्धिष्ट चालु हंगामात पूर्ण करण्याचे उद्धिष्ट आहे.या हंगामात कारखाना ७ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करणार आहे. तसेच सहवीज निर्मिती प्रकल्पामधून ४ कोटी ५० लाख युनिट विजेचे उत्पादन व बायोगॅस प्रकल्पातून ३० लाख घनमीटर एवढे उत्पादन घेण्याचे उद्धिष्ट असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. कारखान्याकडून एफआरपीची देय रक्कम रू.२४८ चालु महिना अखेरपर्यंत शेतकऱ्यांना अदा केली जाईल,अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
याप्रसंगी काटापूजन कारखान्याचे संचालक भागवत गोरे यांच्या हस्ते करण्यात आले .गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, प्रतापराव पाटील, दत्तात्रय शिर्के, दादासो घोगरे, दत्तू सवासे, हरिदास घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, चंद्रकांत भोसले, संगिता पोळ, जबीन जामदार, श्रीमंत ढोले, वैभव जाधव, अनिल चव्हाण, राजेंद्र देवकर, माणिकराव खाडे, पांडुरंग शिर्के, गणेश शेळके, के.एस.खाडे, प्र.कार्यकारी संचालक सुधीर गेंगे-पाटील उपस्थित होते.
निरा भिमा बायो-सीएनजी प्रकल्प उभारणार
मांजरी बु.पुणेदेशातील सहकार क्षेत्रातील पहिल्या बायो-सीएनजी गॅस निर्मिती प्रकल्पाची चालु गळीत सन २०२०-२१ मध्ये प्रायोगिक तत्वावर नीरा भीमा कारखाना उभारणी करणार आहे . यासंदर्भातील सामंजस्य करार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु.पुणे यांचे बरोबर नीरा-भीमा कारखान्याच्या वतीने नुकताच करण्यात आला आहे,अशी माहितीही हर्षवर्धन पाटील यांनी दिली .