महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी गणेश पवार
साखरवाडी येथील श्री दत्त इंडिया लि .साखरवाडी कारखान्याचा वजन काटा अचूक असल्याचा अहवाल वैद्यमापनच्या भरारी पथकाने दिला. प्रादेशिक सह संचालक ( साखर ) पुणे विभाग तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी व उपविभागीय अधिकारी फलटण यांचे आदेशानुसार वैद्यमापन खात्याच्या भरारी पथकाने अचानक भेट देऊन कारखान्यातील वजनकाट्याची तपासणी केली.एस एम यादव तहसीलदार फलटण , श्री .ए .एस .शिरतोडे विशेष लेखापरीक्षक वर्ग -१ एस एन जाधव, पोलीस उपनिरीक्षक फलटण ग्रामीण.मनोज काकडे पुरवठा निरीक्षक फलटण रा.पा आखरे निरीक्षक वैद्यमापन शास्त्र फलटण विभाग , गोपाळ सरक क्षेत्र सहाय्यक वैद्यमापन शास्त्र फलटण विभाग , दत्तात्रय बापूराव शिपुकुले शेतकरी संघटना प्रतिनिधी ता .फलटण यांचा भरारी पथकात समावेश होता . या पथकाने अंगदगाडी , ट्रक , यांचे फेर वजन घेऊन तपासणी केली यात वजन काटा अचूक असल्याचे दिसून आले .कोणताही दोष असल्याचे आढळले नाही.पथकाने कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजित जगताप व मुख्य शेती अधिकारी सदानंद पाटील यांचेकडे काटा बिनचूक असल्याचा अहवाल दिला .यावेळी राजेंद्र भोसले ऊस पुरवठा अधिकारी दिगंबर माने सेंटर प्रमुख पोपट भोसले , संतोष भोसले , नितीन भोसले , जयवंत इंगळे , आदी उपस्थित होते.
































